फटाकेबंदी वरून शिवसेनेत जुंपली ; शिवसेनेचे दोन बडे नेते आमने-सामने

मुंबई : दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही फटाके विक्रीवर बंदी घालण्याची मागणी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन फटाकेविक्री याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. असं अशी माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली आहे. मात्र, आता या मुद्द्यावरुन शिवसेनेमध्येच दुफळी पडल्याचं चित्र आहे.

‘फटाक्यांवर अनेकांचा रोजगार अवलंबून आहे आणि फक्त भारतातच नाही तर जगात फटाके आहेत. त्यामुळे फटाकेविक्री बंद करु नका.’ असा सल्ला देत संजय राऊत यांनी रामदास कदमांच्या मागणीला विरोध केला आहे.

आता दिवाळीच्या ८ दिवस आधीच शिवसेनेत दुफळीचे फटाके मात्र फुटत आहेत.