बाळ एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे कळताच पित्याने काढला पळ

बीड – जालना जिल्ह्यातील रौळसगाव येथील एका महिलेस प्रसुतीसाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करायला आले होते. सदरील महिला प्रसुत झाली. तिला मुलगा झाला, मात्र हा आनंद काही क्षणाचा ठरला. तपासणी अंती महिला आणि बाळ एचआयव्ही पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर महिलेचा पती तिला सोडून पळून गेला.

एक महिन्यापासून महिलेवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून तिच्या बाळाचा आज मृत्यू ही महिला निराधार झाली असून तिला आधार देण्यासाठी आजपर्यंत कोणीही नातेवाईक पुढे आले नव्हते. 30 वर्षीय महिलेस काही दिवसापूर्वी जिल्हा रूग्णालयात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते.

या महिलेची प्रसुती झाली आणि तिला मुलगा झाला. हा तिचा आनंद काही क्षणाचा ठरला. तपासणी अंती महिलेसह तिच्या बाळाला एचआयव्ही असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर महिलेचा निष्ठूर पती तिला सोडून पळून गेला. सदरील महिला एकटीच जिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे महिलेचा एकही नातेवाईक भेटण्यासाठी किंवा धीर देण्यासाठी आला नाही. माणुसकी आहे की नाही असा संतापजनक सवाल उपस्थित केला जात आहे. या महिलेच्या बाळाचे आज सकाळी निधन झाले असून त्याच्यावर दुपारपर्यंत अंत्यसंस्कार करण्यात आलेेले नव्हते.