फक्त न्यायचं नव्हे तर ‘त्या’ महिलेला मिळणार 3 वर्षांचा पगार 

court

पुणे – एच. आय. व्ही. पोझीटिव्ह असल्यामुळे एका महिला कर्मचाऱ्याला राजीनामा द्यायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार काही वर्षांपूर्वी उजेडात आला होता. अन्यायाविरोधात या महिलेने दिलेल्या लढ्याला यश मिळालं असून फक्त न्यायचं नव्हे तर ‘त्या’ महिलेला मिळणार  3 वर्षांचा पगार देखील आता मिळणार आहे.

पुण्यात 2015 मध्ये एका औषध निर्माण कंपनीने एका महिला कर्मचाऱ्याला एच. आय. व्ही. पोझीटिव्ह असल्यामुळे जबरदस्तीने राजीनामा देवून नोकरी सोडायला लावली होती. याबाबत संबंधित महिलेनं कामगार न्यायालयात दाद मागितली होती. त्या महिला कर्मचाऱ्याला आता 3 वर्षांनी न्याय मिळाला असून कामगार न्यायालयाने संबंधित कंपनीला तिला पुन्हा नोकरीवर रुजू करून घेण्याचे गेल्या 3 वर्षांचे पगार देण्याचे आदेश दिले आहेत.

‘आमच्या शहरात वर्णद्वेषी महात्मा गांधींचा पुतळा नको’