Video- काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांत भिडले, मतदानासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना धक्काबुक्की

विश्वजित कदम यांचे निकटवर्तीय आमीर शेख यांच्या कार्यकर्त्यांनी घातला धुडघूस ?

औरंगाबाद- विद्यार्थी कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश (NSUI)च्या प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु असताना औरंगाबाद विभागात मतदानासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना धक्काबुक्की करून, घोषणाबाजी करत हुसकावून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार  समोर आला आहे.

औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सागर कैलास साळुंखे हा प्रदेशाध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहे . महाविद्यालयांमध्ये सुट्ट्या असताना देखील मोठ्याप्रमाणावर मतदानासाठी युवक कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मात्र कोणतीही माहिती न घेता,प्रदेशाध्यक्ष पदाचे दुसरे उमेदवार आमीर शेख याच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः धुडगूस घातला. मतदानासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना धक्काबुक्की करून, घोषणाबाजी करत हुसकावून देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

आमीर शेख हा विश्वजित पतंगराव कदम यांचा पुण्यातील अत्यंत जवळचा कार्यकर्ता  असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  गांधी-नेहरू यांच्या अहिंसा आणि लोकशाही मुल्यांचा टेंभा मिरवणाऱ्या कॉंग्रेसपक्षाची सर्व नितीमुल्ये अक्षरशः पायदळी तुडवल्याचे चित्र आज अवघ्या महाराष्ट्राला पहायला मिळाले.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

झालेला प्रकार हा अतिशय निंदनीय असून पराभव समोर दिसत असल्याने आमीर शेख यांच्या कार्यकर्त्यांकडून असे प्रकार घडवून आणले जात आहेत.– सागर कैलास साळुंखे,प्रदेशाध्यक्ष पदाचे उमेदवार 

पहा व्हिडीओ

Shivjal