निवडणुका जिंकण्यासाठी दंगली घडवणे हा तर भाजपाचा इतिहास : जयंत पाटील

Jayant patil

टीम महाराष्ट्र देशा : पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा दंगली घडवते हा आजपर्यंतचा त्यांचा इतिहास आहे. अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान येत्या १९ तारखेला होणार आहे. याचदरम्यान भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या पश्चिम बंगालमधील रोड शो दरम्यान राडा झाला होता. याच मुद्द्यावरून भाजपा आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले. याचदरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरवर ट्विट करत याचमुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला.

पश्चिम बंगालमध्ये घडलेला हिंसाचार हा भाजपाप्रेरित असल्याचे वेगवेगळ्या पुराव्यांवरून स्पष्ट होते. पंडित विद्यासागर यांच्या पुतळ्याची विटंबना भाजपा कार्यकर्त्यांनी केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा दंगली घडवते हा आजपर्यंतचा इतिहास आहे. असे जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले.

इतकेच नव्हे तर, पराभव समोर दिसत असल्याने भाजपा मुद्दाम आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण करत आहे. भाजपाने येत्या काळात औपचारिक आणीबाणी जाहीर केली तर आश्चर्य वाटायला नको. असेही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.Loading…
Loading...