‘इस्रो’ ची ऐतिहासिक कामगिरी ; एमीसॅटसह २८ नॅनो उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

 

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आज सोमवारी एक ऐतिहासिक कामगिरी केली. भारताच्या एमीसॅट उपग्रहासह इतर देशांचे २८ नॅनो उपग्रहांचे सोमवारी श्रीहरिकोटा येथील अवकाशतळावरून पीएसएलव्ही सी ४५ प्रक्षेपकाच्या मदतीने यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

Loading...

‘इस्रो’ची ही ४७ वी पीएसएलव्ही मोहीम असून सोमवारची मोहीम चार टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे. एमीसॅट उपग्रह हा विद्युत चुंबकीय मापनासाठी काम करणार आहे. प्रक्षेपक अंतराळात ७४९ किमीवर एमीसॅट उपग्रह सोडेल आणि ५०४ किमी ऑर्बिटमध्ये इतर उपग्रहांना प्रक्षेपित करणार आहे.

एमीसॅट आणि नॅनो उपग्रह एकाच वेळी अंतराळात पाठवण्याची ऐतिहासिक कामगिरी ‘इस्रो’ने सोमवारी केली. सकाळी ९ वाजून २७ मिनिटांनी पीएसएलव्ही सी ४५ प्रक्षेपक एमीसॅट व २८ नॅनो उपग्रहांना घेऊन झेपावले. पीएसएलव्ही प्रक्षेपकाने चांद्रयान २००८ व मंगळ ऑर्बिटर २०१३ या दोन्ही मोहिमांत मोठी भूमिका पार पाडली होती. यात अमेरिकेतील २४, लिथुआनियातील ११ ,स्पेनमधील १ तर स्वित्झर्लंडमधील एका उपग्रहाचा समावेश आहे.

एमीसॅट उपग्रहाची खासियत…

एमीसॅटमुळे शत्रूच्या रडारची, तिथे चालणाऱ्या संवादाची आणि प्रदेशाची माहिती मिळवणे शक्य होणार आहे. ४३६ किलो वजनाच्या या उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर गुप्तचर यंत्रणांना पाकिस्तानच्या हालचालींवर अत्यंत बारीक लक्ष ठेवता येणार आहे. रात्रीच्यावेळी सुद्धा फोटो काढण्याची या उपग्रहाची क्षमता आहे. या उपग्रहामुळे शत्रूच्या भागात मोबाईल फोनसह अन्य किती संवाद उपकरणे सक्रीय आहेत ते सुरक्षा यंत्रणांना कळणार आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!