‘टॅक्समध्ये कपात करण्यासाठी उचललेलं पाऊल ऐतिहासिक’

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय अर्थव्यवस्था सध्या डबघाईला आल्याचे चित्र आहे. भारताचा विकासदर हा गेल्या आठ वर्षातील सर्वात खालच्या पातळीवर पोहोचला आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील विकासदर ५ टक्के इतका आहे. सध्या वाहन क्षेत्रात तब्बल २३ टक्क्यांची घट झाली आहे. वाहनांची यावर्षीची विक्री मागील २१ वर्षांमधील सर्वात कमी आहे.

यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजन केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (शुक्रवारी) मोठी घोषणा केली आहे. त्यांनी आज आम्ही देशी कंपन्या आणि नवीन देशांतर्गत उत्पादन करणाऱ्या  कंपन्यांसाठी कॉर्पोरेट कर दर कमी करण्याचा प्रस्ताव ठेवतो. या नव्या घोषणेनुसार कंपन्यांसाठी नवीन कॉर्पोरेट कर दर 25.17 टक्के निश्चित करण्यात आला आहे. याशिवाय कंपन्यांना यापुढे आणखी कर भरावा लागणार नाही अशी माहिती दिली. याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून निर्णयाचं कौतुक केलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी ‘कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात करण्यासाठी उचललेलं पाऊल ऐतिहासिक आहे. मेक इन इंडिया मोहिमेसाठी यामुळे प्रेरणा मिळेल. जगभरातून खासगी गुंतवणूक आकर्षित होण्यासही यामुळे मदत मिळेल. खासगी क्षेत्रात स्पर्धात्मकता वाढेल तसंच जास्तीत जास्त रोजगार निर्माण होईल. यामुळे १३० कोटी भारतीयांसाठी कोणत्याही परिस्थितीत हा विजय आहे असं मोदींनी म्हटले आहे.

तसेच ‘गेल्या काही आठवड्यांपासून सरकारकडून केल्या जात असलेल्या घोषणांवरुन सरकार उद्योगांसाठी भारतात मैत्रीपूर्ण वातावरण तयार करत असल्याचं स्पष्ट होत आहे असंही मोदींनी म्हटले आहे.