औरंगाबाद: ऐतिहासिक औरंगाबाद शहरात सध्या केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केलेल्या ट्विटची जोरदार चर्चा सुरू आहे. ऐतिहासिक औरंगाबाद शहरासाठी ऐतिहासिक निर्णयाची घोषणा लवकरच असे ट्विट कराड यांनी केले आहे. या ट्विटमध्ये डॉ भागवत कराड(Dr. Bhagwat Karad) यांच्या फोटोमागे ऐतिहासिक देवगिरी किल्ला दिसून येत आहे. तसेच नुकतेच शहरामध्ये मेट्रोवरून मोठ्या प्रमाणावर श्रेयवादाचे राजकारण रंगलेले पाहायला मिळाले. त्यामुळे एकूणच सोशल मीडियावर हे ट्विट व्हायरल झाले असून औरंगाबाद शहरासाठी नेमकी ते कोणती घोषणा करणार आहेत. याकडे समस्त नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.
‘लवकरच ऐतिहासिक शहरासाठी ऐतिहासिक निर्णयाची घोषणा’ अशा प्रकारचे ट्विट भागवत कराड यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अमित शहा, नितीन गडकरी यांनाही टॅग केलेले आहे. त्यामुळे औरंगाबादकरांसाठी ही घोषणा अतिशय मोठी असणार आहे. मात्र यावरून आता संभ्रम निर्माण झालेला आहे. नेमकी ती घोषणा कोणती याबाबत सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. औरंगाबाद शहरात लवकरच मेट्रो धावणार आहे त्यासंबंधीचा डीपीआर तयार करण्यासाठी समिती देखील नेमण्यात आली आहे. मात्र आता या मेट्रोचे श्रेय नेमके कुणाचे यावरून काही दिवसांपूर्वी चांगलेच राजकारण चांगले होते. भाजपचे डॉ. भागवत कराड, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, तर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मध्ये मेट्रो वरून श्रेयवादाची लढाई रंगली होती.
लवकरच ऐतिहासिक निर्णयाची घोषणा !
Stay tune #DrkaradUpdates pic.twitter.com/U8W18yQfAE— Dr Bhagwat Kishanrao Karad (@DrBhagwatKarad) January 12, 2022
मेट्रो आपणच आणली असेही तिघांकडून सांगितले जात होते. याच पार्श्वभूमीवर आता डॉ. भागवत कराड यांनी केलेल्या ट्विटमुळे औरंगाबादकरांच्या पदरात नक्की काय पडणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर जनतेला भुलवण्यासाठी ही घोषणा नसेल ना? असे एकीकडे बोलले जात आहे. देवगिरी किल्ल्यावरील रोपवे लाईट अंड साऊंड शो, अखंड उड्डाण पूल, विमानतळ विस्तारीकरण, शहर नामांतर अशा अनेक प्रकल्पांविषयी सध्या जोरदार चर्चा गल्लीगल्लीत होत आहेत.
महत्वाच्या बातम्या