‘ती’ जिवघेणी बारव बुजवण्यास इतिहासप्रेमींचा विरोध

औरंगाबाद : दोन दिवसांपुर्वी घृष्णेश्वर कॉलनीतील सुरेवाडी रोडवरील बारवमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे स्विय सहायक दीपक मोरे यांच्या पत्नी व मुलगी पडून जखमी झाल्या होत्या. यामुळे परिसरातील नागरिक आक्रमक झाले होते. रविवारी आखेर घृष्णेश्वर कॉलनीतील रविवारी लोकसहभागातून ही जीवघेणी बारव बुजवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. शहरातील काही इतिहासप्रेमीनी पुढे येऊन ती बारव बुजवण्यास विरोध केला आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांना त्यांनी निवेदन दिले आहे.

अनेक दिवसापासून जळगाव रोड ते जाधववाडी बाजार समिती या रोडवर घृष्णेश्वर कॉलनीच्या वळणावर असलेली बारव बुजवण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिक करत होते. मनपा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. मात्र दोन दिवसापुर्वी जिल्हाधिकाऱ्याचे स्विय सहायक दीपक मोरे यांच्या पत्नी व मुलगी बारवेत पडून जखमी झाल्या. मग प्रशासनाला खडबडून जाग आली. आणि ही बारव बुजवण्याच्या हालचालीला वेग आला. पण शहरातील ‘अमेझींग औरंगाबाद’ या संस्थेने पुढे येत ही बारव शहराची ऐतीहासिक वास्तु आहे. तिचे जतन करणे गरजेचे आहे. असे या संस्थेने आपल्या निवेदनात म्हणले आहे.

सदरच्या भागात रस्ता नसने हा प्रश्न ऐतिहासीक वास्तूचे संवर्धन करुनही सोडवता येईल असे या संस्थेचे म्हणणे आहे. पर्यायी रस्ता उपलब्ध करुन हा ऐतीहासिक वारसा जतन करावा असे या संस्थेचे म्हणणे आहे. दहा वर्षापासून पडीक जमिनीवर असलेल्या या बारवेत लोक कचरा टाकायचे ते टाळण्यासाठी काही लोकांनी इथे महादेवाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली होती. मात्र मागील आठवड्यात झालेल्या अपघातानंतर रविवारी मुर्ती नागरिकांच्या सहमतीने विधिवत पुजाआर्चना करुन बाहेर काढण्यात आली. आता मात्र या या प्रकरणाला वेगळेच वळण लागत आहे.

महत्वाच्या बातम्या