छत्रपती शिवरायांच्या अस्थींची डीएनए चाचणी करण्याची इतिहासकाराची मागणी

टीम महाराष्ट्र देशा: छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्थींची डीएनए चाचणी करण्याची मागणी इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावंत यांनी पत्र लिहून ही मागणी केली आहे.

शिवाजी महाराजांचा मृत्यू १६८० साली झाला. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर महाराजांची समाधी असून तिथं त्यांच्या अस्थी असल्याचे सांगितले जाते. इंद्रजित सावंत यांचंही हेच म्हणणं आहे.

त्याचबरोबर शिवाजी महाराजांवर विषप्रयोग करण्यात आल्याचा एक प्रवाद आहे. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या कुत्र्यानंही त्यांच्या चितेत उडी घेऊन स्वत:ला संपवलं होतं, अशीही एक थिअरी मांडली जाते. मात्र, सावंत यांच्यासह मराठा संघटनांना ते अमान्य आहे. शिवाय, आणखीही काही समज-गैरसमज आहेत. या सगळ्यांची शहानिशा व्हावी, यासाठी डीएनए चाचणी करण्याची मागणी सावंत यांनी केली आहे.