‘यांची पुढची चार वर्ष फक्त स्वप्न पाहण्यातच निघून जाणार’, संजय राऊतांचा दानवेंना टोला

danave

मुंबई : या सरकारला वर्षपूर्ती होत असतानाच हे सरकार लवकरच पडेल अशी टीका भाजप नेत्यांनी पुन्हा सुरु केल्याचं दिसून येत आहे. ‘येत्या दोन ते तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल. ते कसं येणार आहे, ते पत्रकारांना लवकरच कळवतो’ असं विधान रावसाहेब दानवे यांनी केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

कधी एकमेकांचे तोंडही न पाहणारे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत आहेत. पण येत्या दोन ते तीन महिन्यात महाविकास आघाडीचे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल, असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करून दिला.

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी असा दावा केल्यानंतर त्याला आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलंय. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात हे सरकार पाच वर्ष निश्चित पूर्ण करणार आहे. यांची पुढची चार वर्ष फक्त स्वप्न पाहण्यातच निघून जाणार आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.

मागील वर्षी स्थापन झालेल्या-एक दिवसीय सरकारची आज पुण्यतिथी आहे. आमची सरकार 4 वर्षे पूर्ण करेल. त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्याने विरोधी नेते निराशपणे अशा गोष्टी बोलतात. त्यांना माहित आहे की महाराष्ट्रातील लोक या सरकारच्या सोबत आहेत संजय राऊतांनी भाजपला टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या