हिंजवडीचे पर्यायी रस्ते एप्रिल पर्यंत करा

पुणे : बाणेर ते हिंजवडी फेज तीन – रस्त्यावरील पुलाचे काम एका महिन्यात संपवून हा मार्ग व चांदे-नांदे रस्ता ही सर्व कामे येत्या एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे असे आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिला. चांदे नांदे रस्त्याचे काम एका महिन्यात सुरु करण्याचा आग्रह त्यांनी एमआयडीसीकडे धरला. त्यामुळे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विशेष बाब म्हणून या रस्त्याच्या कामाचे टेंडर एका महिन्यात काढण्याचा निर्णय या बैठकीत घेतला.

 हिंजवडी आयटी पार्क मधील समस्या सोडवण्याबाबत पालकमंत्री गिरीश बापट यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या सोबत मंत्रालयात एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत जिल्हाधिकारी सौरभ रावपुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त किरण गित्ते सार्वजनिक बांधकाम विभागराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे अधिकारी तसेच हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

  बैठकीत पालकमंत्र्यांनी हिंजवडी येथील आयटी कंपन्याना आणि कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या वाहतुकीचा प्रश्नाबाबत सध्याच्या रस्त्यांना पर्यायी रस्तेचांदे – नांदे रस्तातसेच फेज ३ कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाबत संबंधीत सेझ कंपनीजागामालक यांच्याशी चर्चा पूर्ण करण्याची सूचना केल्या. बाणेर ते हिंजवडी फेज तीन कडे जाणारा रस्ता ताब्यात घेऊन एका महिन्याच्या आत त्याचे टेंडर काढण्यात येईल. हिंजवडी येथील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या आग्रहामुळे विशेष बाब म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बैठकीनंतर सांगितले.

 चांदे- नांदे येथील रस्त्याचे मजबुतीकरण तसेच रुंदीकरण करून हा रस्ता चार पदरी करण्यात यावा अशा सूचना श्री बापट यांनी जिल्हाधिकारी आणि एमआयडीसी च्या अधिकाऱ्यांना केल्या.बापट यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी या आठवड्यात जिल्हापरिषदेशी चर्चा करणार आहेत. चांदे-नांदे रस्ता सुरु झाल्यानंतर माण येथील पूल पाडून तो चारपदरी करण्यात येणार आहे. या पुलाच्या अलीकडे वा पलीकडे या अगोदरच चार पदरी रस्ता सुरु झाला आहे.

 हिंजवडी फेज ३ कडे जाणारे रस्ते एप्रिल पर्यंत पूर्ण करा या कामांसाठी एमआयडीसी आणि हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसीयशनच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तीतरित्या पाहणी करण्याचे निर्देश ही श्री बापट यांनी निर्देश दिले.

 या बैठकीत श्री बापट यांनी सुभाष देसाई यांना हिंजवडी येथील आयटी पार्क मधील घनकचरा व्यवस्थापन हा विषय ही गंभीर असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानुसार या पुढील काळात ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या एमआयडीसी तेथील कर गोळा करतीलआणि त्या भागातील रस्ते दिवा – बत्तीआणि घनकचरा व्यवस्थापन करतील. असा निर्णय श्री देसाई यांनी घोषित केला. त्यानुसार या पुढे हिंजवडी एमआयडीसीतील कचरा व्यवस्थापनाचे काम एमआयडीसी करणार आहे. त्यासाठी एमआयडीसीने हिंजवडी येथे जागा राखून ठेवली असून येत्या महिन्यात या कामाची प्रक्रिया सुरु करण्याचे या बैठकीत ठरल्याची माहिती श्री बापट यांनी दिली.

Loading...