सर्वात आधी महाविकास आघाडी स्थापन करणाऱ्या हिंगोलीतच ‘आघाडीत बिघाडी’?

सर्वात आधी महाविकास आघाडी स्थापन करणाऱ्या हिंगोलीतच ‘आघाडीत बिघाडी’?

Mahavikas Aghadi

हिंगोली : जिल्ह्यात महाविकास आघाडीत चांगलीच बिघाडी झाली आहे. त्याला निमित्त ठरलं ते छत्रपती शिवरायांचा पुतळा आगमनाच, त्यानंतर जिल्ह्यातील राजकीय पटलावर चांगलच वातावरण तापलय. महाविकास आघाडीतून ही आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.

१३ ऑक्टोबर गुरुवार रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वसमत शहरात आला आणि राष्ट्रवादीचे आमदार राजू चापके महाराजांच्या घोड्यावर चढले तर शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा ही महाराजांच्या घोड्यावर पाठीमागून चढले. या दोघांनी शिवरायांना पुष्पहार अर्पण केला. पण त्यानंतर मात्र, महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली म्हणून शिवभक्तांनी आमदार नवघरे आणि माजी मंत्री मुंदडा यांचा समाज माध्यमांवर जोरदार निषेध केला.

आमदार नवघरे यांनी घडलेल्या प्रकाराबाबत जाहीर माफी माघीतली. मला खासदार हेमंत पाटील, डॉ जयप्रकाश मुंदडा आणि काही कार्यकर्त्यांनी महाराजांच्या घोड्यावर चढवलं नसता मी घोड्यावर चढलो नसतो, असे नवघरे माफी माघतांना म्हणाले. येथूनच महाविकास आघाडीत खऱ्या अर्थाने धुसफूस सुरु झाली. गर्दी केल्यामुळे स्वाभाविकच पोलिसांनी आमदार, खासदार, पुतळा समिती सदस्य अध्यक्षांसह पाचसे शिवभक्तांवर गुन्हे दाखल केले. पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे माघे घ्यावे, या मागणीआड शिवसेनेने राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांना लक्ष करीत स्वपक्षातील माजी मंत्री मुंदडा यांना सुद्धा शिवसेनेच्या बैठकीत गद्दार ठरवलं.

शिवसेना एवढ्यावरच थांबली नाही तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शुद्धीकरण वसमत येथे जाहीर सभा घेऊन पंचनद्यांच्या पाण्याने केले. येथे खासदार हेमंत पाटिल यांनी राजू नवघरेच्या खासदारांनी मला घोड्यावर चढवलं या वाक्याचा चांगलाच समाचार घेत. मी नवघरेला घोड्यावर चढविल्याचा एक साधा फोटो दाखवा, असे आव्हान दिले. डॉ जयप्रकाश मुंदडा कसे पक्षविरोधी कारवाया करतात ते कसे गद्दार आहेत. याबाबत त्यांच्यावर खासदारांनी जाहीररीत्या सडकून टीका केली. याशिवाय डॉ मुंदडा यांनी महाराजांच्या घोड्याच्या शेपटीला इजा केली असा आरोप ही खासदार हेमंत पाटील यांनी केला.

त्यानंतर राजू नवघरे यांनी आपलं प्रसिद्धी पत्रक काढीत खासदारांनी आपल्याला घोड्यावर ढकललं नाही अस लेखी स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा साखर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी राजू नवघरे यांच समर्थन करीत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आणि खासदार हेमंत पाटील यांच्यावर तोफ डागली. शिवसेनेवाल्यांनी कधी कुठे महाराजांचा पुतळा बांधलाय आणि हे निघाले आहेत महाराजांचे शुद्धीकरण करायला, अरे कोणत्या हाताने महाराजांचे शुद्धीकरण करताय. मटक्याच्या, वाळूच्या की जुगाराच्या असा प्रति सवाल दांडेगावकर यांनी शिवसेनेच्या आमदार खासदारांना विचारला.

त्यानंतर शिवसेनेचे माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी पत्रकार परिषद घेत, अनावधानाने माझे पाय महाराजांच्या पुतळ्याला लागले असे कबूल करीत, आज जाहीर माफी माघीतली. घोड्याला माझ्यामुळे इजा झाली नाही असे स्पष्टीकरणही डॉ. मुंदडा यांनी पत्रकार परिषदेत दिले. स्वपक्षातूनच डॉ. मुंदडा यांना होत असलेल्या विरोधामुळे शिवसेनेतील गटबाजी तर चव्हाट्यावर आलीच पण महाविकास आघाडीतील धुसफूस ही यानिमित्ताने बाहेर निघालीये. राज्यात महाविकास आघाडी होण्यापूर्वी हिंगोली जिल्ह्यपरिषदेत राजीव सातव यांनी महाविकास आघाडी स्थापन केली होती. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी उदयास आली. राज्यातील महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण करायला आता हिंगोलीच तापलेल राजकारण कारणीभूत ठरू नये म्हणजे कमावलं.

महत्त्वाच्या बातम्या