हिंदुत्वानेच भारताला एकजूट ठेवलं; मोहन भागवत

mohan-bhagwat

गुवाहाटी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा उपस्थित करत भारत एक हिंदू राष्ट्र आहे. तसेच जो हिंदुत्वाशी नातं तोडतो, तो भारताशीही नातं तोडतो असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. खानपाडा पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानात पार पडलेल्या कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते.

मोहन भागवत म्हणाले, भारत आता कोणाला आपल शत्रू मनात नाही पण पाकिस्तान पाकिस्तान भारताकडे मैत्रीच्या नजरेतून पाहण्यात अपयशी ठरला आहे. तसेच ‘हडप्पा आणि मोहेंजदाडो सध्या पाकिस्तानात आहे. ते भारताचा घटक आहेत, पण पाकिस्तान त्यांची दखल घेऊ इच्छित नाही. पाकिस्तान हिंदुत्व स्विकारु इच्छित नसल्या कारणानेच एक वेगळा देश आहे’, बांग्लादेशवर टीका करताना भागवत म्हणाले ‘बांगलादेशमधील लोक बांगला भाषा बोलत असतानाही तो एक वेगळा देश कशासाठी? कारण त्या देशाला हिंदुत्वासोबत जुळवून घेण्याची इच्छा नाही’.

तसेच फक्त हिंदुत्वानेच भारताला एकजूट ठेवलं आहे. इतक्या भाषा, धर्म, परंपरा आणि जीवनशैली असतानाही हिंदुत्वाने सर्वांना एकत्र ठेवलं आहे. हिंदुत्व विविधतेचा स्विकार करतो, विभाजनाचं नाही. यामुळेच भारत एक हिंदू राष्ट्र आहे’. उत्तर आसाम क्षेत्राकडून ही परिषद आयोजित करण्यात आली होती. आसामच्या मुख्यमंत्रांसहित राज्यातील अनेक मंत्र्यांनी या परिषदेला हजेरी लावली होती.