मुस्लीमांना जागा नसेल तर हिंदुत्वाला अर्थ नाही : भागवत

mohan bhagavat on raygad

टीम महाराष्ट्र देशा- ‘हिंदू राष्ट्रामध्ये मुस्लिमांना जागा नाही, तर ते हिंदू राष्ट्र होऊ शकत नाही’ असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. नवी दिल्लीत विज्ञान भवनात संघाची तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. यावेळी ‘भविष्यातील भारत’ संवादात आज दुसऱ्या दिवशी मोहन भागवत यांनी उपस्थितांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले सरसंघचालक ?
‘‘हिंदू राष्ट्रामध्ये मुस्लिमांना जागा नाही, तर ते हिंदू राष्ट्र होऊ शकत नाही. आम्ही म्हणतो की, हे हिंदु राष्ट्र आहे. याचा अर्थ हिंदू राष्ट्र म्हणजे तेथे मुस्लीमांना जागा नाही, असा होत नाही. ज्यादिवशी या देशात मुस्लीम नसायला पाहिजेत असे वाटेल त्या दिवशी या देशात हिंदुत्वही राहिलेले नसेल. हिंदुत्व म्हणजे समावेशकता आणि मुस्लीमांना आपले मानणे हा त्याचाच एक भाग आहे. जर आपण मुस्लीमांना स्वीकारत नसू तर ते हिंदुत्व नाही. हिंदुत्व हे भारतीयत्व आणि सर्वसमावेशकता आहे.विविधतेत एकता मानून सर्वांचा सर्वांगीण विकास साधणे हे हिंदुत्वाचे मूळ तत्त्व आहे. त्यामुळे इथला मुस्लीम हिंदुत्वाला वज्र्य नाही. ‘हिंदुत्व’ असा शब्द वापरायचा नसेल तर नका वापरू, ‘भारतीय’ म्हणा. पण या शब्दाला संघाचा विरोध नाही”.

हिंदुस्थान फक्त हिंदूंचा नाही तर इतर धर्मींयाचाही-मोहन भागवत

जे त्यांच्या मूळ देशाला धोकादायक ठरत आहेत ते आश्रय देणाऱ्या देशांसाठी ते सुरक्षित कसे असू शकतील’?-भागवत