हिंदुस्थान फक्त हिंदूंचा नाही तर इतर धर्मींयाचाही-मोहन भागवत

mohan-bhagwat

टीम महाराष्ट्र देशा – ज्याप्रमाणे जर्मन लोकांचा देश जर्मनी आहे, ब्रिटिशांचा देश ब्रिटन आहे, अमेरिकन नागरिकांचा देश अमेरिका त्याचप्रमाणे हिंदुस्थान हा हिंदूंचा आहे. पण हा देश फक्त हिंदूंचा नाही तर इतर धर्मीयांचाही आहे, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. शुक्रवारी इंदूरमधील एका महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. ‘अमर उजाला’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. एवढेच नाही तर कोणताही एक नेता किंवा एक पक्ष हा देशाला महान बनवू शकत नाही तर त्यासाठी समाजाचेही मोठे योगदान असावे लागते, असेही मोहन भागवत यांनी म्हटले आहे.