‘लग्नासाठी धर्मांतरण करणारे हिंदू मोठी चूक करतायत’; भागवतांनी व्यक्त केली नाराजी

‘लग्नासाठी धर्मांतरण करणारे हिंदू मोठी चूक करतायत’; भागवतांनी व्यक्त केली नाराजी

mohan bhagwat

देहरादून:  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी धर्मांतरासंदर्भात मोठ विधान केले आहे. त्यांच्या विधानामुळे सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. उत्तराखंडमध्ये एका आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, हिंदू कुटुंब आपल्या मुलांना धर्माचा अभिमान बाळगण्याबाबत परंपरा आणि मूल्यांचं शिक्षण देत नाहीत, असे सांगत लग्नासाठी अन्य धर्मांत धर्मांतरण करणारे हिंदू मोठी चूक करत असल्याचे म्हणत हिंदू धर्मांतराबाबत असंतोष व्यक्त केला.

भाजपाशासित राज्यांमध्ये कथित ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा आणण्यात आला असताना मोहन भागवत यांनी हे विधान केले आहे.  धर्मांतर कसे काय होते? आपल्या देशातील मुले, मुली इतर धर्मात कसे जातात? छोट्या छोट्या स्वार्थांसाठी, लग्न करण्यासाठी धर्मांतर करणे चुकीचे आहेत. हा मुद्दा वेगळा आहे की, आपण आपली मुले तयार करत नाही, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

आम्ही RSS चे कार्यक्रम आयोजित करतो तेव्हा आम्हाला फक्त पुरुषच दिसतात. जर संपूर्ण समाज संघटित करायचा असेल तर यामध्ये ५० टक्के महिला असल्या पाहिजे, आपली मूळे अधिक घट्ट केली पाहिजे. हिंदू समाज संघटित करणे हाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्य हेतू आहे, असेही मोहन भागवत यांनी सांगितले.

तसेच यावेळी भारतीय कुटुंबव्यवस्थेचं महत्त्व समजावून सांगताना मोहन भागवत यांनी सांगितले की,  “लोकांना आपलं गुलाम बनवण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी चीनमध्ये ओपियम पाठवलं. तरुण त्याच्या आहारी गेले आणि पाश्चिमात्य देशांनी चीनवर राज्य केलं. आपल्या देशातही हेच सुरु आहे. ड्रग्ज प्रकरणं पाहता ते कुठून येतात हे पाहिलंत तर ते का, कशासाठी येत आहेत आणि याचा कोणाला फायदा होत आहे हे तुम्हाला समजेल,” यावेळी पाश्चिमात्य देशही भारतीय कुटुंब व्यवस्थेचा अभ्यास करत होते. तसंच ही मूल्यं नष्ट करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या