पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सामाजिक सलोखा वाढवण्याकडे पाऊल उचलले आहे. आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये एकात्मता जपत सामाजिक समता, बंधुता अबाधित राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी हा उद्देश ठेवून राष्ट्रवादीने ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला स्वतः शरद पवार यांनी निमंत्रण दिले आहे. आता यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर टीका केली.
भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ईद मिलन कार्यक्रमावरून शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. म्हणाले, “पवारसाहेब यांनी सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी दिवाळी मिलन केलेलं आठवतंय का कधी??? कदाचित यांच्या सामाजिक परिभाषेत हिंदू येतच नसावेत”. याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील शरद पवार नास्तिक आहेत असा आरोप केला होता. शरद पवार नास्तिक आहेत शरद पवार यांना हिंदू या शब्दाचीच अॅलर्जी आहे, असेही राज ठाकरे म्हणाले होते.
पवारसाहेब यांनी सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी दिवाळी मिलन केलेलं आठवतंय का कधी??? कदाचित यांच्या सामाजिक परिभाषेत हिंदू येतच नसावेत. pic.twitter.com/3a9q0zTg7Y
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 10, 2022
“देशातील बदलत्या सामाजिक परिस्थितीला काही मूठभर समाजविघातक प्रवृत्ती कारणीभूत आहेत. या सर्व गोष्टींना विरोध करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. येथील सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर कोविड काळापूर्वी दरवर्षी घेण्यात येणारा ईद मिलन कार्यक्रम या वर्षी मोठ्या उत्साहात घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सर्व धर्मियांचे धर्मगुरू, सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे निमंत्रक स्वतः शरद पवार आहेत”, असे राष्ट्रवादीनं सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या –