सिद्धूचे शीर आणा एक कोटी मिळवा

टीम महाराष्ट्र देशा:उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा अपमान करणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धूचे शीर आणा आणि एक कोटी रूपये मिळवा अशी घोषणा हिंदू युवा वाहिनीने केली आहे. हिंदू युवा सेनेचे आग्रा येथील प्रमुख तरूण सिंग यांनी ही घोषणा केली. सिद्धूचे शीर धडावेगळे करा, असेही त्यांनी म्हटले आहे. हिंदू युवा वाहिनी ही संस्था उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संबंधितच आहे. कारण या संस्थेची स्थापना योगी आदित्यनाथ यांनीच केली होती.

राजस्थान येथे झालेल्या रॅलीमध्ये सिद्धूने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात वक्तव्य केले. योगी आदित्यनाथ यांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. त्याचमुळे आम्ही त्याचे शीर आणणाऱ्या माणसाला एक कोटीचे इनाम देऊ असेही तरुण सिंग यांनी जाहीर केले.

नवज्योत सिंग सिद्धू नक्की काय म्हणाले होते ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला देशाचे चौकीदार म्हणवून घेतात पण ते इमानदार नाहीत. तर योगी आदित्यनाथ हे सर्वात मोठे भोगी आहेत, अशी टीका सिद्धू यांनी केली होती.