अमृता फडणवीसही हिंदुत्ववादी ट्रोलकऱ्यांच्या निशाण्यावर

टीम महाराष्ट्र देशा: धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणाऱ्यांवर हिंदुत्ववाद्याकडून केले जाणारे ट्रोलिंगचा सामना अनेकांना करावा लागला आहे. मग ते सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी असो की बॉलीवूड स्टार, मात्र आता याच ट्रोल्सच्या निशाण्यावर आल्या आहेत त्या मिसेस सीएम अमृता फडणवीस.

झाल अस की अमृता फडणवीस यांनी नाताळनिमित्त गरीब मुलांसाठी भेटवस्तू देण्याच्या उपक्रमासाठी ट्विटरवरून आवाहन केल होते. मात्र त्यावरून हिंदुत्ववादी ट्रोल्सचा त्रास अमृता यांना सहन करावा लागला. अखेर हिंदू धर्माचा मला अभिमान असल्याचे स्पष्टीकरण त्यांना द्यावे लागले.

अमृता फडणवीस या नेहमी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत असल्याच आपण पाहतो. त्याच भावनेतून त्यांनी गरीब मुलांना नाताळाचा आनंद मिळवाम्हणून लोकांनी पुढाकार घेऊन भेटवस्तू देण्याचे आवाहन केले होते. यावर शैफाली वैद्य यांनी आक्षेप घेणारे ट्वीट केले. वैद्य यांच्या अनेकांनी ट्विट करत ख्रिस्ती धर्माच्या प्रथा-परंपरांचा पुरस्कार करत असून त्यांना प्रोत्साहन देत असल्याच म्हंटल.