हिंदूत्ववादी संघटना नालासोपारा याठिकाणी रस्त्यावर

टीम महाराष्ट्र देशा : पालघर जिल्ह्यातील भंडारआळी परिसरात एका बंगल्यात एटीएसच्या पथकाने छापा मारला होता. त्यावेळी छाप्यामध्ये 8 देशी बॉम्ब सापडले. तर बॉम्ब बनवण्याची मोठी सामग्री देखील पोलिसांनी जप्त केली आहे. डॉग स्कॉड, फॉरेन्सिक टीमकडून अद्याप या बंगल्यात तपास सुरू आहे. आणि तपासात वैभव राऊतला दोषी ठरवले आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान त्याला न्यायालयात दाखल करावं यासाठी हिंदूत्ववादी संघटना नालासोपारा याठिकाणी आज रस्त्यावर उतरली आहे.

वैभव राऊत हा कट्टर हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा बंगला वैभव राऊत यांच्या मालकीचा आहे. या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका दुकानात देखील बॉम बनवण्याची सामग्री मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली आहे. यामध्य्ये गन पावडर आणि डिटोनेटरचा समावेश आहे.

दरम्यान वैभव राऊत याने ही विस्पोटके का आणि कशी जमा केली याचा आता एटीएस कसून तपास करत आहे. विशेष म्हणजे सामग्री सापडल्याने या घटनेची तीव्रता अधिक वाढली आहे. वैभव हा सनातनी विचारधारेचा असून कुठे घातपात करणार होता का याबाबत अजून कोणतीही माहिती मिळाली नाही. पण एटीएसची टीम गेल्या काही दिवसापासून सतत पाळत ठेऊन होती. आणि शेवटी गुरवारी रात्री त्याच्या घरी धाड टाकून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या त्याच्या घरी कसून तपासणी सुरू आहे.

वैभवला आम्ही सर्व मदत करू : सनातन संस्था

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...