fbpx

भाजप आणि संघाने गांधी हत्येचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये:अशोक शर्मा

gandhi ,nathuram

टीम महाराष्ट्र देशा: ‘हिंदू महासभेच्या नथुराम गोडसेनेच महात्मा गांधी यांची हत्या केल्याचं साऱ्या जगाला माहीत आहे. असं असताना देखील भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ चौथ्या गोळीची थिअरी निर्माण करून विनाकारण संभ्रम निर्माण करत आहेत. गांधी हत्या हा आमचा वारसा आहे. त्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नका,’या शब्दात हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक शर्मा यांनी संघ आणि भाजपला सुनावलं आहे.

‘अभिनव भारत’चे पंकज फडणीस यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. ज्यात ‘गांधीजींची हत्या झाली तेव्हा त्यांना चार गोळ्या लागल्या होत्या. पण चौकशीत तीनच गोळ्यांचा उल्लेख असल्याने या प्रकरणाचा तपास करण्यात यावा,’ असं या याचिकेत म्हटलं आहे.

हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक शर्मा काय म्हणाले ?
चौथ्या गोळीची थिअरी मांडून दोन्ही संघटना संभ्रमाचं वातावरण निर्माण करत आहेत. त्यांच्या खऱ्या चेहऱ्यावरील मुखवटा बाजूला करण्याची वेळ आली आहे. ‘हिंदू महासभेच्या नथुराम गोडसेनेच महात्मा गांधी यांची हत्या केल्याचं साऱ्या जगाला माहीत आहे. असं असताना देखील भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ चौथ्या गोळीची थिअरी निर्माण करून विनाकारण संभ्रम निर्माण करत आहेत. गांधी हत्या हा आमचा वारसा आहे. त्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नका.गांधी हत्येचं श्रेय भाजप आणि संघ आमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. उलट त्यांनी आमचे आभार मानायला हवेत. गोडसे हिंदू महासभेचा अविभाज्य भाग होता. आता भाजप आणि संघ गोडसेला बाजूला सारून गांधी हत्येबाबतचं सर्व श्रेय स्वत: घेऊ पाहत आहेत. गांधीजींना गोडसेनं मारलं नव्हतं हे सिद्ध झालं तर हिंदू महासभेला काहीच अर्थ उरणार नाही, हे त्यांना माहीत आहे. पण आम्ही हे कदापी होऊ देणार नाही,’ असं शर्मा यांनी ठणकावलं.

 

3 Comments

Click here to post a comment