कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्रीपदाला हिंदु महासभेचा विरोध

नवी दिल्ली – कर्नाटकात नाट्यपूर्ण घडामोडीनंतर उद्या जेडीएसचे नेते कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, मात्र कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्री पदाला हिंदु महासभेने विरोध केला असून, याबाबत हिंदू महासभेने सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली आहे. कुमार स्वामी यांचा शपथविधी घटनाबाह्य असल्याचं या याचिकेमध्ये म्हटलं आहे.

तर नव्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांचा समावेश होणार असून ही दोन्ही पदे काँग्रेसला देण्याची सूचना राहुल गांधी यांनी कुमार स्वामी यांना केल्याचे समजते आहे. तसंच काँग्रेसचे आमदार आणि येडियुरप्पा यांच्या विरोधात दंड थोपटणारे डी के शिवकुमार यांनाही महत्त्वाचं मंत्रीपद देण्यात येणार आहे तर दुसरीकडे काल वीरशैव महासभेनेही कुमारस्वामी यांना एक पत्र लिहिले असून राज्याचे गृहमंत्रीपद वीरशैव समाजातील आमदारांकडे द्यावा अशीही मागणी केली आहे. त्यामुळे शपथविधीला अवघे काही तास उरले असताना अजूनही काँग्रेस आणि जेडीएससमोरील अडचणी काही केल्या संपतांना दिसत नाहीयेत.Loading…
Loading...