fbpx

मुफ्तीचे मुंडके उडवा बक्षिस मिळवा – हिंदू महासभा

dy-mufti-kashmir

टीम महाराष्ट्र देशा- दुसऱ्या पाकिस्तानची मागणी करणारे जम्मू कश्मीर मुस्लीम पर्सनल बोर्डचे उपाध्यक्ष आणि डेप्यूटी ग्रँड मुफ्ती नासिर उल इस्लाम यांचे मुंडके उडवणाऱ्यास हिंदू महासभेकडून बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते अशोक कुमार पांडे यांनी मुफ्ती यांचे मुंडके उडवणाऱ्या व्यक्तीला ११ रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी भारतीय मुस्लिमांनी त्यांच्यासाठी वेगळ्या देशाची मागणी करावी असे वक्तव्य केले होते. मुस्लिमांवर अत्याचार आणि भेदभावाचा आरोप करत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंमसेवक संघ हिंदुस्थानी मुस्लिमांना दुसरा पाकिस्तान बनवण्यासाठी भाग पाडत आहे, असे ते म्हणाले होते.

काय म्हणाले अशोक कुमार पांडे ?

‘हिंदुस्थानमधील कोणत्याही व्यक्तीने मुफ्ती यांचे मुंडके धडापासून वेगळे केल्यास किंवा त्यांची हत्या केल्यास त्याला ११ रुपयांचे बक्षिस देण्यात येईल. मुप्ती यांची औकात ११ रुपयांपेक्षा जास्त नसल्याने त्यांच्यावर फक्त ११ रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले’, ‘मुफ्ती यांचे मुंडके उडवणाऱ्या व्यक्तीचा जामीन, जामीन खर्च आणि कुटुंबाच्या देखभालीची जबाबदारी हिंदू महासभा घेईल ‘मुफ्ती यांचे वक्तव्य अखंड देशाविरोधात आहे. ते भारत मातेचे तुकडे करण्याची भाषा करत आहेत. मुफ्ती यांचे वक्तव्य हिंदुस्थानमध्ये इस्लामिक दहशतवादाला आमंत्रण देत आहे.

1 Comment

Click here to post a comment