‘मी हिंदू मुलींना मुस्लीम करण्याच्या मोहिमेवर, पूर्वजांनीही तेचं केलं, मुलही हेचं करतील’

टीम महाराष्ट्र्र देशा : मी हिंदू मुलींना मुस्लीम करण्याच्या मोहिमेवर होतो आणि यापुढेही राहील. माझ्या पूर्वजांनीही तेच केले आणि आता माझे नऊ मुलही हेच काम करतील असे, असे वक्तव्य सिंध राज्यात हिंदूंसाठी धोकादायक ठरलेले अब्दुल खालिक मिथाने यांनी दिव्य मराठी या वृत्तपत्राशी केलेल्या चर्चेत केले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिका दौऱ्यावर आहेत. दरम्यान अमेरिकेतील १० खासदारांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एक पत्र लिहित त्यामध्ये अपहरण व बळजबरीच्या धर्मांतराच्या मुद्द्यावर इम्रान खान यांच्याशी थेट चर्चा करावी असे नमूद करण्यात आले होते.
यादरम्यान, अब्दुल खालिक मिथाने ‘दिव्य मराठी’या वृतापात्राशी केलेल्या चर्चेदरम्यान मी हिंदू मुलींना मुस्लीम करण्याच्या मोहिमेवर होतो आणि यापुढेही राहील. माझ्या पूर्वजांनीही तेच केले आणि आता माझे नऊ मुलही हेच काम करतील असा दावा केला.

Loading...

इतकेच नव्हे तर मी हिंदू मुलींच्या धर्मांतरासाठी दर्ग्यांची व्यवस्था केली आहे. मात्र, मुलींना त्यांच्या घरून आणण्यासाठी कोणती टीम पाठवत नाही. त्या स्वत:च्या मर्जीने येतात. त्यामुळे त्यांच्या लग्नाची व्यवस्था करतो. माझ्या पूर्वजांनी हिंदूंचे धर्मांतर करून इस्लामची सेवा केली आहे. आज मी ही मोहीम पुढे नेत आहे. माझ्या मृत्यूनंतर माझी मुलेही हे काम करतील. मिथानुसार, भारतात घर परतीची मोहीम लवकर थंड पडली, कारण पाकिस्तानात कोणत्याही हिंदू मुलीवर बळजबरी केली जात नाही. घर परतीची मोहीम पाकिस्तान व इस्लामला कमी लेखण्यासाठी होती. असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर पाकिस्तानात एकाही हिंदू मुलीवर दबाव टाकून बळजबरीने धर्मांतर केले गेले असेल तर भारत सर्वात आधी संयुक्त राष्ट्रात गेेला असता. मात्र, त्यांनी तसे केले नाही. माझे घर, दर्गा व दरयाल अमन(सेफ हाऊस)मध्ये १७ पेक्षा जास्त हिंदू मुली आहेत. मात्र, मी त्यांचे धर्मांतर केले नाही. कारण, त्यांची तशी इच्छा नाही. मात्र, जे धर्मांतर करू इच्छितात त्यांना मी पूर्ण सुरक्षा देत असल्याचेही त्यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे पाकिस्तानच्या मानवी हक्क आयोगाने गेल्या वर्षी सदर केलेल्या अहवालात एकट्या सिंध प्रांतात अल्पसंख्याकांच्या धर्मांतराच्या एक हजाराहून अधिक प्रकरणांची नोंद झाल्याचे समोर आले आहे. तर सिंध प्रांतात धर्मांतराचे सर्वात मोठे केंद्र धरकी शहरातील भरचुंदी दर्गा असून. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा निकटवर्तीय अब्दुल खालिक मिथा तो चालवत अस्ल्यचिएहि त्यात समोर आले होते.

इतकेच नव्हे तर अब्दुल खालिक मिथा हा ७८ वर्षाचा असून त्याला आणखी एक लग्न करण्याची इच्छा त्याने बोलून दाखवली आहे. मी आणखी एक निकाह करावा,अशी फॉलोअर्सची इच्छा आहे. त्याप्रमाणे वधूचा शोधही घेत आहे, मात्र नवी बेगम हिंदुस्थानी असावी अशी त्याची इच्छा असल्याचेही समोर आले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
मराठा क्रांती मोर्चाचा पहिला बळी ' मी ' ठरलो : आमदार भारत भालके
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
रडत राऊतांमुळे यापुढे सामना बंद,बंद,बंद : मनसे
माझं कुणी काहीच ' वाकडं ' करू शकत नाही : संजय राऊत