fbpx

दहशतवादी कृत्यात हिंदू कट्टरपंथीयांचा सहभाग- कमल हसन

टीम महाराष्ट्र देशा- कमल हसन यांनी ‘हिंदू दहशतवादा’वरून मुक्ताफळे उधळली आहेत . उजव्या विचारसरणीने आता ‘मसल पावर’चा वापर करण्यास सुरूवात केली आहे. हिंसाचारात त्यांचा सहभाग असून, हिंदू शिबिरांमध्ये आता दहशतवाद घुसला असल्याची टीका त्यांनी तामिळ साप्ताहिक ‘आनंदा विकटन’मध्ये लिहिलेल्या लेखातून केली.
पूर्वीचे कट्टर हिंदू चर्चा करण्यावर विश्वास ठेवत. पण आता ते हिंसेत सहभागी होतात, असे म्हणत उजव्या विचारसरणीच्या लोकांवर हिंसेला कारणीभूत असल्याचे अनेक गंभीर आरोप त्यांनी या लेखातून केले आहेत. कमल हसन यांनी केरळ सरकारचे कौतुकही केले. केरळने तामिळनाडूपेक्षाही चांगल्या पद्धतीने धार्मिक हिंसाचाराचा प्रश्न हाताळल्याचे ते म्हणाले.
कमल हसन यांच्या या लेखामुळे हिंदू दहशतवादावरून पुन्हा एकदा नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवाद तसेच भगवा दहशतवाद या शब्दांचा वापर करून उजव्या विचारसरणीच्या मंडळीना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी मोठा वादंग शिंदे यांच्या विधानामुळे निर्माण झाला होता . आता कमल हसन यांनी जे गंभीर आरोप केले आहेत त्यावर हिंदुत्ववादी संघटना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

1 Comment

Click here to post a comment