Share

Anand Dave | “औरंंगजेब, अफजलखानाच्या कबरी नेस्तनाबूत करा नाहीतर…”; हिंदू महासंघाचा राज्य सरकारला इशारा

Anand Dave | सातारा :  साताऱ्यातील किल्ले प्रतापगड (Pratapgad fort) येथील अफजलखानाच्या कबरी शेजारी उदात्तीकरण करण्यासाठी वनविभागाच्या हद्दीत अनेक खोल्यांचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. ते पाडून टाकण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती. यावर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सातारा प्रशासनाने हे बांधकाम हटवण्याची कारवाई आज पहाटेपासून सुरु केली आहे. यावर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी भाष्य केलं आहे.

राज्यातील स्वराज्याचे शत्रू असलेल्या औरंगजेब आणि अफजलखानाच्या कबरी नेस्तनाबूत करून टाकाव्यात, अशी मागणी आनंद दवे (Anand Dave) यांनी केली आहे. राज्य सरकारने या कबरी उद्ध्वस्त केल्या नाही, तर हे काम हिंदू महासंघ करेन, असा इशाराही त्यांनी दिलाय.

आनंद दवे (Anand Dave) म्हणाले, “अफजलखान तसेच औरंगजेब यांच्या कबरींना उद्ध्वस्त करून टाकावे. सरकारने हे काम करावे. सरकारला हे जमत नसेल तर हिंदू महासंघ हे काम करेन. स्वराज्याच्या शत्रूचे काय हाल होतात, हे दिसले पाहिजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखान तसेच इतरांच्या कबरींना जागा दिली.”

मात्र अफजलखानाच्या वंशजांनी, त्याच्या नातेवाईकांनी तसेच त्याच्या भक्तांनी हिंदुस्तानावर तसेच हिंदूंवर प्रेम केलेले नाही. याच कारणामुळे मला वाटतंय की या कबरींची आता गरज नाही. सर्वांना इतिहास पाठ झालेला आहे,” अशी प्रतिक्रिया आनंद दवे यांनी दिलीय.

पुढे ते म्हणाले, “मागील अनेक दिवसांपासून आम्ही अफजलखानाच्या कबरीभोवतीचे अतिक्रमण काढले गेले पाहिजे, अशी मागणी करत होतो. अफजलखानासारख्या राक्षाला दैवत्व देण्याचे काम काही समाजकंटक करत होते. ही कबर काढण्याचे पुण्याचे काम राज्य सरकार करत आहे. औरंगजेब, अफजलखान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला. हिंदुंना त्रास दिला. हिंदुंची मंदिरं तोडली. त्यामुळे त्यांच्या कबरी राज्यात कशाला हव्यात?” असा सवाल करत आनंद दवे (Anand Dave) यांनी कबरी नेस्तनाबूत करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, प्रतापगड, महाबळेश्वर,वाई, कराड, सातारा येथेही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या परिसरात जमावबंदीचे १४४ कलम लागू करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या :

Anand Dave | सातारा :  साताऱ्यातील किल्ले प्रतापगड (Pratapgad fort) येथील अफजलखानाच्या कबरी शेजारी उदात्तीकरण करण्यासाठी वनविभागाच्या हद्दीत अनेक खोल्यांचे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics Satara

Join WhatsApp

Join Now