Share

Rahul Gandhi | “राहुलजी गांधी, तुमच्या आज्जीने सावरकरांचं पत्र वाचलं नव्हतं का?…”, हिंदू महासंघ आक्रमक

Rahul Gandhi | मुंबई : राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबाबत विधान केलं होतं. यानंतर भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षाने एकमेकांवर हल्लाबोल केला. त्यामुळे सावरकर वाद चांगलाच पेटला आहे. अशातच हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे (Anand Dave) यांनी देखील या वादात उडी घेतली आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या आजीने म्हणजेच इंदिरा गांधी यांनी सावरकरांना (Sawarkar) देणगी दिली होती. त्यांनी सावरकरांच्या कर्तृत्वाबद्दल बोलताना पत्रात धाडसी असा उल्लेख केला, तो काय कुणाच्या दबावाखाली केला होता का? राहुल गांधींनी त्यांच्या आजीने सावरकरांना लिहिलेलं हे पत्र वाचलं नव्हतं का, असा सवाल आनंद दवे यांनी केलाय.

सावरकर यांनी माफी मागितली हे निश्चितच खरं आहे. कारण बाहेर येऊनच ते काम करू शकले असते.. पण त्या पत्रात एकवेळ मला सोडू नका पण इतरांना तरी सोडा असंही वाक्य आहे. या वाक्याबाबत राहुल जी काय बोलणार आहेत, असं देखील आनंद दवे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Rahul Gandhi | मुंबई : राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबाबत विधान केलं होतं. यानंतर भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षाने …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics