शनिवार वाड्यावरील ‘एल्गार परिषदे’ची परवानगी रद्द करा – हिंदू आघाडी

samasta hindu agadi

पुणे: कोरेगाव- भीमा पराक्रमाच्या 200 व्या वर्षपूर्ती निमित्ताने शनिवार वाड्यावर होणाऱ्या एल्गार परिषदेला दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी समस्त हिंदू आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी परवानगी रद्द करण्याची मागणी करणारे पत्र महापौर तसेच पालिका प्रशासनाला दिले आहे. हिंदू आघाडीच्या आधी पेशव्यांच्या वंशजांनी देखील हा कार्यक्रम शनिवारवाड्यावर घेण्यास विरोध केला आहे.

शनिवार वाड्यावर केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्याच्या नियम आहे. मात्र एल्गार परिषद कार्यक्रम हा राजकीय स्वरूपाचा असून त्याला देण्यात आलेली परवानगी महापालिका नियमांचे उल्लंघन करणारी आहे. सदर कार्यक्रमात गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी येणार असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणारे म्हणून कुप्रसिद्ध आहेत. त्यामुळे या परिषदेमुळे शनिवारवाडा पटांगण वापरण्याच्या नियमांचे उल्लंघन होणार असल्याच या पत्रात सांगण्यात आलं आहे. महापालिकेने याबाबत लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी अन्यथा आम्हाला पुढील कारवाईचा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा देखील समस्त हिंदू आघाडीकडून देण्यात आला आहे.

दरम्यान याबद्दल महापौर मुक्ता टिळक यांना विचारलं असता ‘ एल्गार परिषदेला सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून महापालिकेची परवानगी देण्यात आली आहे. मात्र यामध्ये काही राजकीय व्यक्ती सहभाग घेणार आल्याचे समजते त्यामुळे हा कार्यक्रम जर राजकीय असल्यास नियमा प्रमाणे परवगी देणे शक्य नाही. त्यामुळे हा कार्यक्रम नियमांननुसार नसल्यास यांची परवगी नाकारण्याचा सूचना प्रशासनला दिल्या असल्याचे’ त्यांनी सांगितलं.