अखेर हिंदी सैराटच्या शूटिंगला मुहूर्त मिळाला

टीम महाराष्ट्र देशा – दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ने केवळ मराठीच नाही तर तमाम भाषांमधील प्रेक्षकांना ‘याड लावलं’. सैराटचे ‘झिंगाट’ यश पाहून बॉलिवूडमधील निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने सैराटचे हक्क विकत घेत चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्याची घोषणाही केली. परंतु, अनेक अडचणींमुळे ‘सैराट’च्या या हिंदी रिमेकला मुहूर्त काही मिळत नव्हता. मात्र, आता सगळ्या अडचणींतून मार्ग काढत करणच्या हिंदी ‘सैराट’च्या चित्रीकरणाला १ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

‘सैराट’च्या रिमेकमधून जान्हवी कपूर हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. सैराट’च्या हिंदी सिनेमाचे दिग्दर्शन शशांक खेतान करणार आहे. याआधी शशांकनं ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यामुळं मराठी मनावर अधिराज्य गाजवणारा ‘सैराट’ हिंदीमध्ये काय करतो, याबद्दल उत्सुकता आहे.

You might also like
Comments
Loading...