मुंबई : “मी हिंदी सिनेसृष्टीला परवडणार नाही. बॉलीवूड मध्ये मला वेळ वाया घालवणे जमणार नाही,” असे विधान दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू याने केले. महेश बाबूचे हे वक्त्यव्य एकूण सर्वांना धक्का बसला आहे. हिंदी सिनेमा चाहत्यांनी याची अपेक्षा देखील कधी केली नसेल.
‘सरकारु वारी पाटा’ या फिल्म च्या प्रदर्शनाची प्रतीक्षा सध्या महेश बाबूला आहे. हा सिनेमा १२ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म विषयीसुद्धा महेश बाबू बोलला. मी मोठया पडद्यावरचा हिरो आहे, त्यामुळे मी ओटीटी प्लॅटफॉर्मचा विचार देखील करत नाही. माझा उद्देश्य मला स्वत:ला भारतात स्टार म्हणून सादर करणे असे नाही. तर साऊथ सिनेमांना देशभरात यशस्वी करणे हा माझा मूळ उद्देश आहे. तेलगु चित्रपट ही माझी ताकत आहे, असे महेश बाबूने म्हंटले.
मला प्रसिद्धी ही दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये येऊन मिळाली आहे. त्यामुळे अशी इंडस्ट्री सोडण्याचा मी कधीच विचार करत नाही. मी कायम माझे चित्रपट उत्तम बनवून माझे नाव मोठे करण्याचा विचार करतो. आता सर्व स्वप्न पूर्ण होत आहेत. आता मला काहीही मिळवण्याची इच्छा नाही, असे महेश बाबूने म्हंटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :