हल्लेखोरांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा; हिना गावित यांची लोकसभेत मागणी

नवी दिल्ली :  खासदार हिना गावित यांच्या गाडीवर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ काल हल्ला झाला होता. या हल्ल्यातून गावित थोडक्यात बचावल्या होत्या. या हल्लेखोरांवर कारवाई करण्यात यावी तसेच सबंधित पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी त्यांनी लोकसभेत केली आहे.

दरम्यान काल गावित यांना झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज भाजपाकडून नंदुरबार शहर, व नवापूर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. दुपारी अडीच्या सुमारास धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान गावित यांना कार्यालयातचं रोखण्याचा प्रयत्न झाला. काही आंदोलकांनी गावित यांच्या गाडीवर चढून हल्ला केला होता.

कोकणातील लोकसभा मतदार संघांची जबाबदारी एकनाथ शिंदेंकडे