हिना गावित हल्ला प्रकरण : दलित- आदिवासी संघर्ष समितीतर्फे उद्या धुळ्यात मोर्चा

धुळे – भाजप खासदार हिना गावित हल्ल्याप्रकरणी दलित- आदिवासी संघर्ष समितीतर्फे 14 ऑगस्टला धुळ्यात मोर्चा काढला जाणार आहे. याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. मराठा आरक्षणासाठी मागणी करणाऱ्या आंदोलकांना आमचा पाठिंबाच आहे, असंही पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं.

डॉ. हिना गावित यांच्या मोटारीवर मराठा आंदोलनावेळी झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात २५ जणांविरोधात अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासहित आयपीसीच्या कलम ३०७, १४३, १४७, ३४१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासदार हिना गावित यांच्या गाडीवर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हल्ला झाला होता. या हल्ल्यातून गावित थोडक्यात बचावल्या होत्या. या हल्लेखोरांवर कारवाई करण्यात यावी तसेच सबंधित पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी त्यांनी लोकसभेत केली होती.

सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांना अटक करा : जितेंद्र आव्हाड

पावसाअभावी जळून चाललेल्या पिकांचे पंचनामे करा, आ. दिलीप सोपल यांची मागणी