नंदूरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांवर खा.हिना गावित संतापल्या!

नंदुरबार : नंदूरबार जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवरून खासदार डॉ.हिना गावित या जिल्हाधिकाऱ्यांवर चांगल्याच संतापल्या आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियोजन करण्याची सूचना २० मार्चला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांना केली होती. पण लोकप्रतिधीनींना न जुमानता स्वत:च चुका करायच्या आणि अपयशाचे खापर लोकप्रतिनिधींवर फोडायचे हा प्रकार जिल्हाधिकारी करत आहे. त्यांनी हा प्रकार बंद करावा असा इशारा गावित यांनी दिला आहे.

नंदूरबारमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यात जिल्हाधिकाऱ्यांना अपयश आले आहे. रेमडेसिविर इंजेक्शन गरजवंतापर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढला. तसेच मृतांचा खरा आकडा लपवण्यात येतोय असा गंभीर आरोप गावित यांनी केला. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
यावेळी त्या म्हणाल्या की, जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिविर इंजेक्शन वाटपाची प्रेसनोट प्रसिध्द केली. मात्र, खासगी हॉस्पिटलमध्ये तेवढे इंजेक्शन वितरित करण्यात आलेले नाही. मग उर्वरित रेमडेसिविर गेले कुठे?, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करता विशिष्ट खासगी वितरकांना रेमडेसिविर का देण्यात आले?. या प्रकरणाची तक्रार पंतप्रधान,मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येईल.

ग्रामीण भागात मृत्यूचा आकडा वाढतो आहे. कोविड प्रत्येक गावात पसरला आहे. परंतु जिल्हा प्रशासनाकडे नियोजनाचा पत्ता नाही. एवढे दिवस प्रशासन काय करत होते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी ठराविक वितरकांची जाणीवपूर्वक तपासणी करत नाही. जिल्ह्याला १.२७ टक्के रेमसीडीवीरचे वितरण करण्यात यावे, असे शासनाचे आदेश आहेत. कोविड हॉस्पिटलला रेमडेसिविर देण्याचा नियम डावलून विशिष्ट सामाजिक संघटनेला ते देण्यात आले. रेमडेसिविरचा तुटवडा जिल्हाधिकारी व ड्रग्स इन्स्पेक्टरमुळे झाल्याचा आरोप गावित यांनी केला.

महत्वाच्या बातम्या

IMP