हिमांशू रॉय यांचा कॅन्सर पूर्ण बरा झाल्याचा डॉक्टरांचा दावा

मुंबई – अतिरिक्त पोलीस आयुक्त हिमांशू रॉय यांनी काल आपल्या निवास्थानी रिव्हाल्वर मधून गोळी झाडून, आत्महत्या केल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. त्यांना कॅन्सर असल्यामुळे रॉय यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होती.

Loading...

मात्र हिमांशू रॉय यांचा कॅन्सर पूर्ण बरा झाला होता अशी माहिती कॅन्सर तज्ज्ञ डॉ. राम नगरकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. रॉय यांच्या उपचारात डॉ.नगरकर सहभागी होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचे रिपोर्टर्स आले होते त्यात कॅन्सर पूर्ण बरा झाल्याचं आढळलं होतं. असं असतानाही त्यांनी केवळ निराशेतून आत्महत्या केली असावी असंही ते म्हणाले.गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते. सततच्या उपचारामुळं त्यांची प्रकृती ढासळली होती.Loading…


Loading…

Loading...