हिमाचल प्रदेशमधील भूस्खलनातील मृतांच्या संख्येत वाढ

शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीनंतर झालेल्या भूस्खलनातील मृतांच्या संख्येत वाढ होऊन ही संख्या ६५ वर पोहोचली आहे. मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (१२ ऑगस्ट) झालेल्या भूस्खलनामुळे दोन बस ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या. यातील एक बस चंबावरुन मनालीला जात होती. तर दुसरी बस मनालीहून कटराला चालली होती. या दुर्घटनेमध्ये ५० जण ठार झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.