Share

Himachal Pradesh Election Result | हिमाचल प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काटे की टक्कर! काँग्रेस आघाडीवर

Himachal Pradesh Election Result | हिमाचल प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काटे की टक्कर होत आहे. आतापर्यंत भाजप २६ जागांवर तर काँग्रेस ३८ जागांवर आघाडीवर आहेत. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार जयराम ठाकूर सेराज मतदारसंघातून विजयी झाले आहेत. आज दुपारपर्यंत नव्या सरकारबाबत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे. सध्या भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत आहेत.

हिमाचल प्रदेशमध्ये १९८५ पासून कोणत्याही पक्षाने सलग दोन विधानसभा निवडणुका जिंकलेल्या नाहीत. या डोंगराळ राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता राहिली तर तो विक्रम ठरेल. दरम्यान भाजप नेते विनोद तावडे सध्या शिमला येथे तळ ठोकून आहेत. तर प्रियंका गांधी देखील शिमल्यात दाखल झाल्या आहेत.

भाजप आपल्या विजयी आमदारांची शिकार करू शकते, अशी भीती काँग्रेसला आहे, ही भीती आणि ‘ऑपरेशन लोटस’ लक्षात घेऊन काँग्रेसने हिमाचल प्रदेशातील आमदारांना राजस्थानला पाठवण्याची योजना आखली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि ज्येष्ठ नेते भूपिंदर सिंग हुड्डा यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Himachal Pradesh Election Result | हिमाचल प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काटे की टक्कर होत आहे. आतापर्यंत भाजप २६ जागांवर तर काँग्रेस …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या