fbpx

भारताची नवी सुवर्णकन्या : हिमा दासनं पटकावलं ११ दिवसांत तिसरं सुवर्ण

टीम महाराष्ट्र देशा- भारतीय वेगवान धावपटू हिमा दास हिने ११ दिवसांत तिसरे सुवर्णपदक जिंकत नवा इतिहास रचला आहे. झेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या क्लांदो स्मृती अॅथलेटिक्स स्पर्धेत हिमा दासने २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे.

आसाममधील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या हिमानं गतवर्षी २०  वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक भरारी घेतली होती. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय धावपटू ठरली होती. त्यानंतर तिच्या कामगिरीत सातत्य पाहायला मिळाले.