धक्कादायक : बाद नोटांचा सर्वाधिक भरणा अमित शहांच्या बँकेत

amit shaha

मुंबई : पंतप्रधान मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद केल्या यानंतर भाजपाध्यक्ष अमित शहा संचालक असलेल्या अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत नोटाबंदीनंतर सर्वाधिक पैसे जमा झाल्याची माहिती समोर आली आहे.

अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेने या बँकेत नोटाबंदीनंतर पाच दिवसांत ७४५.५९ कोटी रुपये जमा झाले होते. रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकांना १४ नोव्हेंबर रोजी जुन्या नोटा स्वीकारण्यास बंदी घातली. तोपर्यंत राजकोट जिल्हा सहकारी बँकेनेही ६९३.१९ कोटींच्या बाद नोटा स्वीकारल्या.