दिल्लीतील `ब्लू लाईन’च्या सर्व ५० मेट्रो स्थानकांवर हायस्पीड वाय-फाय सेवा

नवी दिल्ली : `दिल्ली मेट्रो’ने आजपासून `ब्लू लाईन’च्या सर्व ५० मेट्रो स्थानकांवर हायस्पीड वाय-फाय सेवा सुरू करण्यात आली.वाय-फायचा वापर करण्यासाठी प्रवाशांना नोंदणी केल्यानंतर `ओय डीएमआरसी फ्री वाय-फाय’चा पर्याय निवडावा लागणार आहे. द्वारका सेक्टर २१ व वैशाली / नोएडा सिटी सेंटर या स्थानकांदरम्यान या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

या सुविधेमुळे प्रवाशांना स्थानक परिसरात सर्व मानक इंटरनेट ॲप्लिकेशनचा वापर करता येणार आहे. पुढील ६ ते ९ महिन्यांत येलो लाईन (हुडा सिटी सेंटर – समयपूर बादली) या मार्गावरही ही सुविधा सुरू करण्यात येईल, असे दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाने (डीएमआरसी) म्हटले आहे.