पुण्यातील सेक्स रॅकेटचा भंडाफोड, परदेशी तरुणींची सुटका

पुणे : पुण्यातील मुकुंदनगर परिसरात ‘स्पा’ मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला हायप्राेफाइल वेश्याव्यवसाय पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या थायलंडच्या चार तरुणींची सुटका केली अाहे.

याप्रकरणी प्रशांत रमाकांत बधे (३८, रा.धनकवडी, पुणे) व महेश गणेश लांडगे (२४, पुणे) यांना अटक केली आहे. त्यांच्यासह दर्शन नरेन शहा, मलिक कासिफ खान व इद्रिस बद्री यांच्या विराेधात पीटा कायद्यानुसार स्वारगेट पोलिसांत गुन्हा दाखल केला अाहे. मुकुंदनगर येथील सुजय गार्डन बिल्डिंगमध्ये ‘अाैरा थार्इ स्पा अॅण्ड सलून’ नावाचे दुकान अाहे. या दुकानात मसाज सेंटरच्या नावाखाली हायप्राेफाइल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती.

टुरिस्ट अाणि बिझनेस व्हिसावर नोकरीचे व पैशाचे आमिष दाखवून थायलंडच्या युवतींना मसाज पार्लरमध्ये आणून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात हाेता. पोलिसांनी घटनास्थळावरून ३ लाख १४ हजार रुपये, माेबाइल, कागदपत्रे जप्त केली अाहेत. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय फोफावला असून यावर पोलिसांचे नियत्रंण राहिले नाही.