Rohit Pawar | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) अडचणीत येण्याची शक्यता दिसत आहे. भाजप (BJP) राम शिंदे (Ram Shinde) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बारामती ॲग्रो लिमिटेड कारखान्याची चौकशी करण्याची मागणी केली. ही कंपनी रोहित पवार यांच्यासोबत संबंधित असून मुख्यमंत्र्यांनी ही मागणी कुबूल केली आहे.
इंदापूर तालुक्यामधील शेटफळगडे येथील बारामती ॲग्रो या कारखान्याने नियमाचं उल्लंघन केलं. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केलेली चौकशी मला मान्य नसल्याने मी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचं यासंदर्भात लक्ष वेधलं आहे, असं राम शिंदे यांनी म्हटलं आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आताच या प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आठ दिवसांमध्ये अहवाल सादर करावा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मी सर्व पुरावे त्यांच्याकडे सादर केले आहेत, असं देखील राम शिंदे म्हणाले.
दरम्यान, १५ ऑक्टोबरपूर्वी गाळप सुरू करणाऱ्या कारखान्यांच्या कार्यकारी संचालक आणि इतरांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १९ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. १५ ऑक्टोबरपूर्वी कारखाना सुरू केल्यास महाराष्ट्र राज्य साखर कारखाने आदेश, १९८४ खंड चारचा भंग होतो, असं राम शिंदे यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Bhaskar Jadhav | “आपण यांना पाहिलंत का?”, मुंबईमध्ये भास्कर जाधव यांच्या विरोधात विरोधकांची बॅनरबाजी
- Eknath Shinde | “आता पवार आणि शेलार पॅनल देखील ‘या’ स्पर्धेत उतरले असून…”, एकनाथ शिंदे
- Sameer Wankhede | “उपमहासंचालकांनी माझा छळ केला”, समीर वानखेडेंचा एनसीबीवर धक्कादायक आरोप
- Deepali Sayyed | दीपाली सय्यद शिंदे गटात जाणार? म्हणाल्या, “लवकरच माझा…”
- Jayant Patil | “बंड करणाऱ्या एकनाथ शिंदे गटातील आमरांना आता पश्चाताप होता आहे”, जयंत पाटलांचा दावा