fbpx

भीमा कोरेगाव प्रकरण; ‘त्या’ आरोपींची अंतरिम जामिनावर सुटका करण्यास न्यायालयाचा नकार

court

मुंबई – कोरेगाव-भीमा येथे उसळेल्या दंगलीमध्ये एकजणाला आपला प्राण गमवावा लागला होता. दरम्यान या दंगलीत त्या व्यक्तीच्या हत्येचा आरोप असलेल्या तिघांची अंतरिम जामिनावर सुटका करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला.

१ जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथे उसळलेल्या दंगलीत राहुल फटांगडे याला जमावाने मारहाण केली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.पोलिसांनी या प्रकरणी चेतन अल्हट (१९), अक्षय अल्हट (२०) आणि तुषार जुंजाळ (१९) यांना अटक केली. त्यांनी अंतरिम जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र असलेले टी शर्ट घातल्याने पोलिसांनी अटक केली. फटांगडेला मारहाण केली, हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांकडे पुरावे नाहीत किंवा या तिघांकडून कोणतेही शस्त्र जप्त केलेले नाही.

याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. भारती डांग्रे यांनी या जामीन अर्जांवर तत्काळ सुनावणी घेणे गरजेचे नाही, असे सांगत सुनावणी पुढील महिन्यात ठेवली. कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे यांनाही अटक केली होती. गेल्या महिन्यात पुणे सत्र न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.