भाजपाला हायकोर्टाचा दणका, रथयात्रेला परवानगी नाकारली

  टीम महाराष्ट्र देशा :भाजपाध्यक्ष अमित शाह यांना पश्चिम बंगालमध्ये ‘रथयात्रा’ काढण्याची परवानगी नाकारून न्यायालयाने भाजपाला चांगलाच दणका दिला आहे.कोलकाता उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय खंडपीठाने याबाबतचा निर्णय दिला आहे. अमित शाह यांच्या रथयात्रेमुळे राज्यात  जातीय तेढ निर्माण होऊ शकतो, असं पश्चिम बंगाल सरकारच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आलं.

Rohan Deshmukh

त्यावर रथ यात्रा शांततेत पार पडेल असं भाजपाची बाजू मांडणारे वकील अनिंद्या मित्रा म्हणाले. परंतु जातीय तेढ अथवा दंगली झाल्यास त्याला जबाबदार कोण राहील असा प्रश्न न्यायालयाने विचारला असता, पण कायदा आणि सुव्यवस्था पाळणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे असं उत्तर भाजपाचे वकील अनिंद्या मित्रा यांनी दिलं. त्यानंतर न्यायालयाने परवानगी देण्यास नकार दिला.

सुमारे दहा हजार किलोमीटरचा प्रवास करून प. बंगालमधील ४२ लोकसभा मतदारसंघांना यात्रेद्वारे प्रत्यक्ष भेट देण्याचा भाजपचा मानस होता, मात्र आता उच्च न्यायालयाने परवानगी नाकारल्याने रथयात्रा होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...