Share

Breaking News । ऋतुजा लटकेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा ; महापालिकेला राजीनामा मंजूर करण्याचे दिले आदेश

मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीबाबत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र मुंबई महापालिकेने त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही तर त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. अशातच शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने मंजूर केला नव्हता. त्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली होती.

उमेदवारी जाहीर झालेल्या ऋतुजा लटके यांच्या मुंबई महानगरपालिकेविरोधातील याचिकेवर गुरुवारी दुपारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती नितीन जमादार यांच्या खंडपीठाने पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना उत्तर देण्यासाठी तासाभराचा अवधी दिला होता. यावर निर्णय झाला असून ऋतुजा लटके यांचा जमीन मंजूर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

शिवसेना ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात तातडीने सुनावणी झाली. यावेळी ऋतुजा लटके यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटले की, ऋतुजा लटके यांनी राजीनामा 2 सप्टेंबर रोजी दिला. त्यानंतर 29 सप्टेंबर रोजी राजीनामा फेटाळण्यात आला. 3 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. आम्ही नियमांनुसार मुंबई महापालिकेकडे राजीनामा सुपूर्द केला. एक महिन्याचा नोटीस पिरियड पूर्ण करायचा नसेल तर एक महिन्यांचा पगार द्यावा लागेल असे सांगण्यात आले. एक महिन्याचा पगार कोषागरात जमा केला असल्याचे लटके यांच्या वकिलाने सांगितले.

ऋतुजा लटके यांचा राजीनामा आयुक्तांकडे मंजुरीसाठी प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. ऋतुजा लटके ज्या पदावर आहेत, त्यानुसार राजीनामा हा सहआयुक्तांकडून मंजूर होतो. निवडणूक लढवत असल्याने राजकीय दबावामुळे राजीनामा मंजूर केला जात नसल्याचे लटके यांच्या वकिलांनी हायकोर्टात सांगितले. ऋतुजा लटके यांचा जमीन मंजूर करण्याचे आदेश दिल्याने आता अंधेरी पूर्व निवडणुकीतील उमेदवाराचा प्रश्न सुटला आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीबाबत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics