‘या’ निर्णयाबद्दल राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा दणका!

high court uddhav thakrey

मुंबई: गेले ४ महिन्यांहून अधिक काळ कोरोनाने राज्यासह देशभरात थैमान घातले आहे. तर, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी केंद्र सरकारतर्फे टाळेबंदीची घोषणा करण्यात आली होती. यानंतर, ३१ मे रोजी अनलॉकची प्रक्रिया सुरु करत, राज्यातील निर्बंधांचे अधिकार राज्य सरकारला देण्यात आले होते. तर, या टाळेबंदीकाळात शैक्षणिक क्षेत्र, ते चित्रपटसृष्टी अशा सर्वच क्षेत्रांना फटका बसला असून अनेक उद्योग-व्यवसायांचे आर्थिक नुकसान झाले.

बॉलिवूडसह, सर्व प्राकराच्या शूटिंगमध्ये ६५ वर्षांवरील कलाकार, टेक्निशियन आणि इतर संबंधितांना काम करण्यास राज्य सरकारतर्फे बंदी घालण्यात आली होती. यावर अनेक ज्येष्ठ कलाकारांनी नाराजी व्यक्त करत, सरकारच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार आता, मुंबई हायकोर्टाने 65 वर्षांवरील कलाकारांना शूटिंगपासून रोखण्याचा सरकारचा निर्णय रद्द करण्याचे ठरवलं आहे.

विजयदुर्ग किल्ल्याची पडझड; खासदार संभाजीराजेंनी पुन्हा गाठली दिल्ली

65 वर्षावरील कलाकार, टेक्निशियन आणि संबंधितांना कामाची परवानगी देण्यात आली आहे. कोरोना लॉकडाऊनदरम्यान महाराष्ट्र सरकारने बॉलिवूडच्या शूटिंग संबंधित गाईडलाइन जारी केली होती. मुंबई हायकोर्टाने सरकारच्या गाईडलाइनमध्ये बदल करून 65 वर्षांवरील कलाकारांना शूटिंगची परवानगी दिली आहे. राज्य सरकार एका ज्येष्ठ नागरिकाला आपलं दुकान उघडण्यास आणि दिवसभर बसण्यास थांबवत नसेल तर सध्याच्या लॉकडाऊनमध्ये ते कोणत्या आधारावर 65 वर्षांवरील वयाच्या कलाकारांना शूटिंगला येऊ देण्यास का थांबवत आहेत, असा सवाल देखील मुंबई हायकोर्टानं याआधी महाराष्ट्र सरकारला केला होता.

काश्मीर मधील बदलांमुळे गैरसमाजाचे धुके नष्ट होईल-प्रा. विनय चाटी

मात्र, महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारची गाईडलाइन असल्याचं सांगून याप्रकरणातून अंग झटकलं होतं. यानंतर प्रोड्यूसर फेडरेशनने मुंबई हायकोर्टात याबाबत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुंबई हायकोर्टानं 65 वर्षांवरील कलाकारांना शूटिंगपासून रोखण्याचा सरकारचा निर्णय रद्द ठरवला आहे. 65 वर्षावरील कलाकार, टेक्निशियन आणि संबंधितांना कामाची परवानगी देण्यात आली आहे.

Breaking News: पिंपरी-चिंचवड पुन्हा रेडझोनमध्ये, प्रशासनाचे नवे आदेश