राज्याचे मुख्यमंत्री आहेत की एका पक्षाचे, फडणवीसांना उच्च न्यायालयाने सुनावलं

टीम महाराष्ट्र देशा: कॉम्रेड गोविंद पानसरे तसेच डॉ दाभोलकर हत्या प्रकरणात तपास यंत्रणांकडून सुरु असलेल्या संथगती तपासावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. गृह विभागाची जबाबदारी असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील न्यायालयाने सुनावले आहे.

गृह खात्यासह ११ खात्यांचा कारभार सांभाळता, मग तशी कार्यक्षमताही दाखवा, राज्याचे मुख्यमंत्री हे एका पक्षाचे नव्हे तर संपूर्ण राज्याचे असतात, अशा शब्दात उच्च न्यायालयाने फडणवीसांना सुनावले आहे. तपासाकडे लक्ष देण्यास व तपासातील अडथळे दूर करायला मुख्यमंत्र्यांना वेळ मिळत नाही काय, असा जाब यावेळी न्या. धर्माधिकारी यांनी विचारला आहे.

आजकाल प्रत्येक गोष्टीमध्ये न्यायालयाला लक्ष घालवे लागत आहे, बेकायदेशीर बांधका, गुन्हेगारांना पकडणे, सिनेमा प्रदर्शित करण्यासोबतच आता तर निवडणुका सुरळीत पाडण्याचे कामही न्यायालयाला करावे लागते.असल्याचं म्हणत न्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली आहे.