मुंबईत फेरीवाल्यांना कुठेही धंदा करु देण्याची निरुपम यांची मागणी हायकोर्टाने फेटाळली

sanjay-nirupam

मुंबई : मुंबईत फेरीवाल्यांना कुठेही धंदा करु देण्याची निरुपम यांची मागणी हायकोर्टाने फेटाळली आहे.मुंबईत फेरीवाल्यांना निर्धारित फेरीवाला क्षेत्रातच व्यवसाय करण्यास परवानगी आहे. रेल्वे पादचारी पूल, स्काय वॉकवर फेरीवाल्यांना मनाई करण्यात आली आहे.शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळे, हॉस्पिटलच्या 100 मीटरच्या आवारात तसेच रेल्वे स्टेशन, पालिका मंडईच्या १५० मीटर परिसरात मनाई करण्यात आली आहे.फेरीवाल्यांवरील कारवाईविरोधात मुंबई हायकोर्टात दाद मागणाऱ्या मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम जबरदस्त धक्का मानला जात आहे.