fbpx

राजकीय फायद्यासाठीच हिंसाचार होऊ दिला का ?

manohar-lal-khattar_146886311272_650x425_071816110616

राम रहीमला बलात्कार प्रकरणी दोषी ठरवल्यानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला होता . या सर्व प्रकरणावर हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त करत हरियाणा सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे.हरियाणा सरकारने राजकीय फायद्यासाठीच हिसाचार होऊ दिला का ? असा सवाल कोर्टाने उपस्थित केला आहे .
बाबा राम रहीम विरोधात कोर्टाच्या निर्णयानंतर उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 31 जणांना आपला जीव गमावावा लागला आहे, तर 300 हून अधिकजण जखमी झाले आहेत.काल शुक्रवारी दुपारनंतर हरियाणा, पंजाबसह चार राज्यांमध्ये ठिकठिकाणी बाबा समर्थकांनी मोठा धुडगूस घातला. यात तीन न्यूज चॅनेलच्या ओबी जाळण्यात आल्या तसंच सरकारी मालमत्तेचं नुकसान करण्यात आलं. बाबा समर्थकांनी काल संध्याकाळी जवळपास 200 गाड्या जाळल्या आहेत.या सर्व हिंसाचारावर आता काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आलं आहे. राम रहीम समर्थकांच्या 65 गाड्या आणि त्यातील शस्त्रही पोलिसांनी जप्त केली आहेत.

या सर्व घटना घडत असताना सरकारने घेतलेल्या भूमिकेवर हायकोर्टाने एकप्रकारे संशय व्यक्त केला आहे .परिस्थिती हाताबाहेर जात असताना सरकारने अक्षरशः आत्मसमर्पण केल्याचं कोर्टाने मत व्यक्त केल आहे. सर्वकाही माहिती असून देखील हिंसाचार होऊ नये म्हणून योग्य पावलं क उचलली नाहीत ?तसेच हरियाना सरकारने राजकीय फायद्यासाठीच हिसाचार होऊ दिला का ? असा सवाल कोर्टाने उपस्थित केला आहे .