भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी मंदाकिनी खडसेंना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

mandakini eknath khadse

मुंबई : काही दिवसांपूर्वीच भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना मुंबई उच्च न्यायालयाने भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठा दिलासा दिला आहे. अटक झाल्यास ५० हजारांच्या जामिनावर सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच १७ ऑक्टो. ते २९ नोव्हें. पर्यंत प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने मंदाकिनी यांना देण्यात आले आहेत.

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी मंदाकिनी यांच्याविरोधात दोन दिवसांपूर्वीच मुंबई सत्र न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. या प्रकरणी त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु, सुनावणीवेळी त्यांचा अर्ज फेटाळून लावत त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली होती.

दरम्यान, याच प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांना वैद्यकीय कारणांमुळे दिलासा मिळाला असून त्यांच्याबाबत पुढील सुनावणी येत्या २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या